सहजीवनातील लिंगभाव    लिंग शारीरिक असते तर लिंगभाव सामाजिक. आपले कपडे, आपली वागणूक, जबाबदार्‍या, कर्तव्य, एक स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून कसं असावं, हे जेव्हा समाज ठरवताना दिसतो तो लिंगभाव. पुरुषांनी एकदम खंबीर असायला पाहिजे, असं म्हणताना एक माणूस म्हणून त्याची भावनिक बाजू त्याने लपवावी, असा आग्रह असतो; हे सामाजिक बंधन झालं. मुळात स्त्री आणि पुरुषामधला मुख्य फरक शारीरिक आहे आणि तो तितकाच आहे. बाकी स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय? असं विचारल्यानंतर येणारी उत्तरं नाजूक, सुंदर, भावनिक तर पुरुषाच्या बाबतीत रांगडा, जबाबदार, अशी जेव्हा येतात, तेव्हां नक्कीच कळून चुकतं, की आपण लिंगभावाच्या विळख्यात किती घट्ट बसून आहोत!  हेच विचार आपल्याला सहजीवनातदेखील सोडत नाहीत. जोडीदार निवडताना मुळातच विषमता असलेल्या कित्येक बाबींचा आधार घेत आपण जोडीदाराची निवड करतो.
    सध्या ‘झी मराठी’वर खूप गाजत असलेली एक मालिका. त्यातली सुरुवातीला गृहिणी असलेली नायिका नंतर उद्योजिका बनते. नवर्‍याने गृहिणी म्हणून तिची उडवलेली टर किंवा मग बायकांना काय जमतं, असं म्हणत सतत तिला दुय्यम वगैरे समजणं, असं सुरू असतं. तिच्या एका मुलाखतीत ती मोठ्या अभिमानाने सांगते की, बाई कितीही मोठी उद्योजिका झाली, तरी घरचं काम, जबाबदार्‍या तिला चुकत नाहीत. हे सांगताना तिचं कौतुक याच गोष्टीसाठी जास्त होताना दिसतं, की ती घरकाम सोडत नाही. ती तिच्या घरातल्या कामाच्या जबाबदार्‍या पूर्ण करून उद्योजिका बनते. अशी सून म्हणजे आदर्श सून, बायको, मुलगी, वगैरे वगैरे. तिने घरातील कामाची जबाबदारी कोण्या दुसर्‍याला दिली म्हणजे ती एक चांगली स्त्री नसेल का? तिचा नवरादेखील उद्योजक आहेच. मात्र, तो बाहेरच्या कामात इतका गुंतलेला असतो म्हणून घराकडे असलेलं त्याचं दुर्लक्ष सहज चालवून घेतलं जातं. मात्र, तिने असं केलं तर?
    मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चेला सगळ्यात जास्त वेळ घेणारा विषय म्हणजे घरकाम! जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न विचारला, की साहजिक सुशिक्षित लोकं सांगतील, अर्थात दोघांची... पण खरंच तसं दिसतं का? घरकामात कायम कोण गुंतलेलं असतं? ऑफिस झालं की घरी जाऊन काय काय कामं करायची याची मोठ्ठी यादी कोणाच्या डोक्यात असते? असे प्रश्न विचारले गेले, की मग ‘अती होतंय’ वगैरे ऐकायला मिळतं. पण या प्रश्नांवर विचार कधी होणार? मी माझ्या बायकोला समजून घेईन आणि तिला घरकामात मदत करेन, असं उत्तर जेव्हा एखादा मुलगा देतो, तेव्हंा खरं तर प्रश्न पडतो की, स्वतःच्याच घरात तो तिला मदत कशी करणार? फार तर तो त्याच्या कामाची, त्याच्या घराची जबाबदारी स्वतः घेऊ शकेल. मात्र, जेव्हा तो म्हणतो की, माझ्या बायकोला मदत करेल, याचा अर्थ घरकाम हे केवळ तिचंच कार्यक्षेत्र आहे आणि तिला त्याचसाठी आणलेलं आहे, असं समजून चालायचं का? अजूनही मुलगीच लग्नानंतर मुलाच्या घरी जाते म्हणून खरं तर हा प्रश्न जास्त पडतो, की ती त्याच्या घरी जाते; मात्र त्याच्या घरातल्या कामाची सगळी जबाबदारी तिची कशी? पाण्यात पडलं की पोहता येतं, असं कामाच्या बाबतीत मुलींना सांगितलं जातं. आता लग्न झालंय म्हणजे काम आलंच पाहिजे वगैरे... काही मुलींचं उत्तर असंही बघायला मिळतं की, माझ्या नवर्‍याने किचनमध्ये पाय ठेवलेला देखील मला चालणार नाही. वरील दोन्ही उदाहरणं लिंगभाव दाखवतात. घरकाम पुरुषदेखील तितक्याच उत्तमपणे करू शकतो. मात्र, स्त्रीच्या नांवावर ते ठेवल्याने घरकाम = बाई, असं जणू गणितच जमलं. इतक्या मांडणीवरून इथे स्त्री विरुद्ध पुरुष चित्र उभं असल्यासारखं वाटत असलं, तरीही सहजीवनात ही विषमता झाल्याने कित्येक अडचणी निर्माण झाल्याचं आपण सतत बघतो. घरकाम ही दोघांची जबाबदारी आहे. तिची जितकी, तितकीच ती त्याचीही आहेच, हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
    आपल्याकडे आपण कोणाला ‘अरे-तुरे’ करून बोलतो, कोणाला अगदी मानपान देऊन बोलतो यावर आपण त्या व्यक्तीला दिलेली किंमत ठरते, असं मोठे सांगतात. पण हे खरं आहे का? म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींना जेव्हा आपण सहज ‘अरे-तुरे’ करतो, त्यात त्यांना आदर नसतो का? मान नसतो, की प्रेम नसतं? एका अगदी जवळच्या मैत्रिणीचा प्रेमविवाह झाला. लग्नापूर्वी ती त्याला ‘अरे- तुरे’च करायची. लग्नानंतरदेखील काही महिने-वर्ष ती त्याला एकेरी हाक मारायची. मात्र, तिला दिवस गेले तसं ती तिच्या नवर्‍याला ‘अहो’ वगैरे म्हणायला लागली. कारण विचारलं, तर त्याला बापाचा फील द्यायला हवा ना, म्हणून... उत्तर खूपच चमत्कारिक वाटलं. ‘बापाचा फील’ जबाबदारी, प्रेमाने येणार, की बायकोने असं मानापानाने हाक दिल्यानंतर? प्रेमविवाहात पुष्कळ मुलांची अपेक्षा असते, की लग्न होईस्तोवर ठीक; मात्र नंतर मानपानानेच बोललं पाहिजे. काहींची अपेक्षा असते, की बेडरूममध्ये ‘अरे तुरे’ केलेलं चालेल; मात्र चारचौघांसमोर ‘अहोच’ केलं पाहिजे. काही मुली म्हणतात मीच नाही मान दिला तर अजून कोण कसं देईल? मान कामावरून, वागणुकीवरून मिळतो. तो तुम्ही केवळ पुरुष आहात म्हणून मिळावा असा आग्रह जरा अती नाहीये का? याला कारण सांगितलं जातं, की आधी नवर्‍याचं वय बायकोपेक्षा जास्त असायचं म्हणून ही पद्धत पडली वगैरे... पण, मग एकसारखे वय असणारे जोडपेदेखील हेच करताना दिसतात. सुरुवातीला अगदीच रोमँटिक वाटतं काही जणांना असं ‘अहो’ वगैरे म्हणणं. गंमत म्हणजे काहींच्या फोनचा नंबर पण ‘अहो’ म्हणून सेव्ह झालेला दिसतो. लग्न झाल्यावर मान दोघांनाही का नको? एकेरी हाक मारणं, नावाने हाक मारणं आदर न करण्याचं सूचक कसं असू शकेल? रेवती तिच्या नवर्‍याला नावानेच हाक मारते. पण मग ‘तुम्ही’ वगैरे बोलते. कारण त्याचं वय जास्त आहे. मात्र, रेवतीने ‘अरे-तुरे’ करावं; कारण ते चांगली मैत्री निर्माण करेल, अशी त्याची इच्छा असूनही त्यांच्यात तसं अजून शक्य झालंच नाही.
    आमच्या घरी मासिक पाळीमध्ये चार दिवस बाजूला बसावंच लागतं, असं मनिषाची सासू लग्नाच्या एक महिन्यानंतर तिला जेव्हां सांगते, तेव्हां मानिषाला प्रचंड दडपण येतं. कारण, माहेरी तिने असं काहीही केलेलं नसतं. याउलट, मंजिरीच्या माहेरी हे सगळं चालायचं. पण, सासरी मुळीच कोणी पाळत नाही, याचा मंजिरीला खूप त्रास होतो. मनिषाला तिचा नवरा ‘त्या चार दिवसांत’ माहेरी जा म्हणून सांगतो. पण, नैसर्गिक असलेल्या या गोष्टीला असा विटाळ का मानावा? हे मनिषाच्या समजण्यापलीकडे आहे. नर्स असलेल्या कवितालादेखील याला सामोरं जावं लागायचं. पाळी आली म्हणून बाजूला तर बसायला लागायचंच; शिवाय मिळणारं जेवण हे ‘सासू उपकार करतेय’ अशा अविर्भावात असायचं. काही सासवा तर सुनांच्या पाळीच्या दिवसांत काम जास्त झालं म्हणून त्यांना बोल लावतानाही दिसतात. याचं समर्थन करताना त्यांना चार दिवस आराम मिळावा म्हणून असं केलं जातं वगैरे सांगतात. मात्र, कोणाला काही दिवसांसाठी अस्पृश्य समजणं, ही भावना नक्कीच आरामदायक नाही. यावर आधीच बोलणं होणं गरजेचं आहे. बर्‍याचदा मुलांना आपल्या घरात काय चालतं हे माहीत नसतं; ते लग्नापूर्वीच बोललं गेलं पाहिजे. येणार्‍या मुलीकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्या आधीच माहीत असणं जास्त योग्य.
    नांवात काय आहे, असं म्हणताना अर्थात नावांत बरंच काही आहे, हे सहज लक्षात येतं. लग्नानंतर मुलीचं नांव बदलतं. केवळ मधलं आणि आडनांव नाही, तर पहिलं नांवदेखील कधी कधी बदललं जातं. २०-२५ वर्ष ती ज्या नावाने वाढली आहे, ज्या नावाने तिला ओळख दिली आहे, तेच नांव बदलायचं? काही ठिकाणी मुली याला नकार देतात. पण, काही ठिकाणी ही कल्पना मुलींना रोमँटिकही वाटते. प्रमोदचं नांव ‘प्र’ पासून म्हणून मग ‘रमोला’चं नांव ‘प्रमिला’ झालं. लग्नसोहळ्यात तांदळात नांव लिहिणं वगैरे सगळे विधी झाले. आता ‘रमोला’ची ‘प्रमिला’ झाली इथवर ठीक. पण, एकदा तिचा नवरा बोलता बोलता तिला म्हणाला, रमोला नांव ऐकलं तेव्हा ती त्याला नांवाने अगदीच फालतू वगैरे वाटली होती. म्हणून मग नांवच बदलून टाकावं, असं तिला बघितल्यानंतर त्याला वाटलं. रमोलाच्या मनावर हा नक्कीच एक आघात होता. शिवानीला नांव बदलण्यात मुळीच रस नव्हता, हे तिनं आधीच बोलून घेतलं होतं. मात्र, आडनांव तर बदललं गेलंच पाहिजे, असा विक्रमच्या बाजूने आग्रह असल्याने लग्न ठरलं नाही. हाच स्पष्टपणा आधी असावा, नंतर यामुळे मनं जास्त दुखावली जातात.
    लग्नासाठी देविका स्थळं बघतेय. मात्र, मुलगा तिला तिच्यापेक्षा वयाने जास्त हवा, कमाई देखील त्याची जास्तच असावी. मागच्या लेखात स्पष्ट केल्यानुसार हा निवडीचा पायाच मुळी समान नाहीये, सुधीरची कमाई देविकापेक्षा जास्त; मात्र शिक्षण आणि वय थोडं कमी म्हणून ती त्याला नकार देते. अरमान अपेक्षाला नकार देतो. कारण तिची उंची त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. हे दिसताना थोडं वाटलं, तरी त्यात सामावलेली विषमता खूप मोठी आहे. म्हणून अरमान आणि देविका, अपेक्षा आणि सुधीरला स्वीकारू शकत नाहीत. मुलाचं वय जास्त, उंची जास्त, पगार जास्त, शिक्षण जास्त, मुलीचं अनुक्रमे हे सगळं कमी. जास्त शिकलेली, कमावती, उंचीची, वयाची मुलगी ऐकण्यातली नसते वगैरे समीकरण यामागे असावं. म्हणजे मुली कानाखालच्याच असाव्यात. अन्वरला वय, कमाई, शिक्षण, उंची जास्त असलेली मुलगी चालणार आहे; पण अपेक्षेत सोबत तो लिहितो, या सगळ्या गोष्टींचा तिला गर्व नसावा. वय आणि उंची नैसर्गिक असली तरी कमाई आणि केलेल्या शिक्षणाचा तिला अभिमान असू नये, ही अपेक्षा कशी समर्थनीय असू शकते? पण खरं तर अशी अपेक्षा असते.
    ‘लग्न झालेल्या स्त्रीला आणि पुरुषाला कसं ओळखायचं?’ असा प्रश्न कार्यशाळेत केल्यानंतर मिळणारी उत्तरं हमखास ‘तिच्या सौभाग्य अलंकारा’वरून तर पुरुषाच्याबाबत मात्र ‘जबाबदार’ वगैरे अक्षरशः शोधाशोध करून दिलेली उत्तरं असतात. लग्न झालं म्हणजे मंगळसूत्र, जोडवे, कुंकू, सिंदूर असं काही तिच्या शरीरावर असलंच पाहिजे, असा काहींचा ठाम समज असतो. या सौभाग्य प्रतिकांमुळे ती सुरक्षित असते, असाही युक्तिवाद आहे. मंगळसूत्र असलं, की कोणी वाकड्या नजरेनं बघत नाही, असं ज्योती सांगत होती. सिंदूर म्हणजे लाल सिग्नल आहे, तसंच मंगळसूत्र म्हणजे लायसन्स आहे वगैरे आपण सतत ऐकतो. आजकाल कुठे इतक्या मुली मंगळसूत्र घालतात? असं म्हणणारे ‘चारचौघांसमोर तरी घालावं लागेल,’ असा आग्रह करतात. काहींना मंगळसूत्र जसं सुरक्षित असण्याची पावती वाटते, तसंच काही मुलींना आणि मुलांना ती गुलामगिरी वाटते. एखादी स्त्री अमुक एका पुरुषाची मालमत्ता आहे म्हणून ती आता उपलब्ध नाही, असा काहीसा मेसेज त्यातून जातो असंही वाटतं. त्यात मंगळसूत्र घालण्याचा एक विधीच असतो. पुरुष स्त्रीला मंगळसूत्र घालतो म्हणजे आता ती त्याचीच आहे वगैरे गृहीत असते. याउलट पुरुषाच्याबाबत मात्र असे काही विधी नसतात. सौभाग्य अलंकार कमी महत्त्वाचा विषय नक्कीच नाही. तो लग्नापूर्वीच चर्चिला जावा. मंगळसूत्र घालण्यामागे आणि न घालण्यामागे असलेल्या स्वतःच्या भूमिका आधीच बोलल्या गेलेल्या असल्या तर जास्त सोपं. हे बोलणं घरच्यांसोबत होणंदेखील तितकंच महत्वाचं आहे.
    लग्न झालं, की सासर दोघांनाही मिळतं. मात्र, सासरी मिळणारी वागणूक दोघांना सारखी नसते, हे सत्य आहे. सून म्हणून मिळणारी वागणूक वेगळी तर जावई म्हणून वेगळी. विदुला आणि समीर नोकरीच्या निमित्ताने मुंबईला असतात. मात्र, जेव्हां जेव्हां सासरी जाण्याची वेळ येते, तेव्हां सासरी गेलं की अगदी गेल्यापासून जितके दिवस सासरी असणार तितके दिवस विदुलाने जबाबदारी घ्यावी, असं सासरी वाटत असतं. विदुलाची सगळी सुट्टी मग सासरच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तर जातेच; मात्र ‘सुट्टीला आलाय’ म्हणून समीरला पूर्ण आराम असतो. आजकालच्या मुलींना कामच जमत नाही. जबाबदारीच घेता येत नाही वगैरे तिला नेहमी ऐकवलं जातं. समीरच्या आईची तब्येत खराब असल्याने मध्यंतरी विदुलाला ६ महिने रजा घ्यावी लागली. समीर येऊन जाऊन करत होताच. मात्र पूर्ण जबाबदारी विदुलाची होती. अशी कित्येक उदाहरणं आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसतात. खरं तर, दोघांच्या घराची जबाबदारी दोघांचीही आणि तितकीच आहे. सून किंवा जावई म्हणून ती कमी जास्त होत नाही. विदुलाच्या सासरी पहिली जबाबदारी समीरची आहे आणि त्यासोबत विदुला त्याला मदतीला म्हणून असेल तर विदुलाच्या घराची पहिली जबाबदारी तिची असेल आणि त्यासोबत समीर तिला मदतीला असेल. मात्र असं होताना दिसत नाही. विदुलाच्या माहेरची जबाबदारी समीर अगदीच नावाला वगैरे घेतो. पण समीरच्या माहेरची जबाबदारी सून म्हणून विदुलाला अगदी सगळं सांभाळून घ्यावीच लागते. अगदी ६ महिने विदुलाने एकटीने सुट्टी घेण्यापेक्षा काही दिवस समीर आणि काही दिवस विदुला, असं नक्कीच जमू शकत होतं. पण तिचं करिअर, ऑफिस, काम यासमोर तिने नेहमी घराला प्राधान्य द्यावं, हा आग्रह असतोच. थोडक्यात काय, तर दोघांना लग्नानंतर मिळणारं सासर सारखं नसतं, जे असणं गरजेचं आहे.
    लग्नाला सहा वर्षं झाली. पण, अस्मा आणि किरणला बाळ नाही, यावरून अस्माला सतत ऐकवलं जातं. किरणमध्ये दोष आहे, हे त्याला माहित असूनही तो इतर ट्रीटमेंटचा किंवा दत्तक घेण्याचा विचार करत नाही. सविताला दोन बाळं असावीत असं तिचं लग्नापूर्वीच ठरलं होतं. मात्र, कार्तिकला एकच हवं असल्याने तिला या इच्छेसोबत तडजोड करावी लागते. लग्नानंतर पाळणा अगदी वर्षभरात हललाच पाहिजे, सुरुवातीला एक मूल होऊन जाऊ द्या, मग काय ती तुमची प्लॅनिंग करा वगैरे गोष्टी सतत सांगितल्या जातात. 
    लग्नापूर्वी सहज गप्पांमध्ये रमेशने अनिताला सांगितलं, की त्याला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. अनिताला त्याचा तो निर्णय आवडला म्हणून दोघांनी लग्न केलंही. मात्र, लग्नानंतर स्वतःचं मूलंच हवं, असा आग्रह रमेशच्या घरून झाल्याने त्याला दत्तक मुलगी घेण्याचा विचार सोडावा लागला. शर्वरी चार वर्षाची झाली आता अजून एक बाळ हवंच, असा तिच्या आजीचा आग्रह सुनीताला त्रासदायक आहे. मुलाच्याबाबत असलेल्या भावनिक अपेक्षा, गरजा लक्षात घेता याबाबत प्रत्यक्ष आईवडिलांपेक्षा घरातील मोठे लोक निर्णय घेताना दिसतात. एक मूल हवंय, दोन हवेत, कधी असावं वगैरे सगळे निर्णय घरचे सांगतात असंच चित्र असतं. मातृत्व कितीही सुखकारक असलं तरी जान्हवीला ते नकोय. हे तिनं लग्न होण्याआधीच अजितला सांगूनही आता लग्नानंतर काही वर्षातच इतरांच्या अपेक्षित प्रश्नाला उत्तरं अजित देत नाही, हा एकट्या जान्हवीचा निर्णय आहे, असं तो सांगून मोकळा होतो. मातृत्व नाकारणारी बाई कशी असू शकते अशा इतरांच्या नजरा जान्हवीला टोचतात.
    नवर्‍याने मारलं आणि पावसाने झोडलं तर कोणाला सांगायचं, अशी म्हण आपल्याकडे आहे. पावसाचा जसा भरवसा नाही, तसाच नवर्‍याचा पण नाही! म्हणजेच, त्याला मारण्याचा अधिकार आहे, हे यातून अधोरेखित होतं. कमी शिकलेले, तळच्या वर्गातले लोकच फक्त आपल्या बायकांना मारतात, हा भ्रम असेल तर तो आताच काढायला हवा. अगदी सुखवस्तू कुटुंबातही अशी मारहाण सहज होताना दिसते. भाजीत मीठ कमी पडलं, कामावरून घरी आल्यावर मुलांनी गोंधळ केला, लवकर डबा करून दिला नाही. ते कोणासमोर तरी उलट बोलली म्हणून हात उचलणारे उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या वरच्या वर्गातलेही दिसतात. जातीचा धर्माचा अपवाद तर याला नाहीच. कौटुंबिक हिंसाचार हा एक गुन्हा आहे. मात्र, प्रेम, काळजी आहे म्हणून मारण्याची वाईट पद्धत आपल्याकडे आहे. स्वतःला वरचढ समजणारी कोणतीही व्यक्ती सहज हात उचलते. तसंच नवरा-बायकोच्या नात्यातही होतं. 
    वर मांडलेल्या सगळ्या मुद्यांतून दिसून आलेली विषमता शेवटी असं रूप घ्यायला वेळ लावत नाही. बायको माझ्याच मालकीची वस्तू आहे, असं समजणारा नवरा कधीही हात उचलू शकतो आणि त्याचं त्याला वाईटही वाटत नाही. रुपाली दिसायला एकदम सुंदर आहे म्हणूनच मंगेशने तिच्यासोबत लग्न केलं. मात्र, लग्नानंतर तिच्याकडे सगळे का बघत असतात, असा संशय घेत तो तिला सतत बंधनं घालू लागला. थोड्या थोड्या संशयावरुन रूपालीला मारहाण करायला लागला. सहन न झाल्याने रुपालीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे ‘लफडं चालू आहे, म्हणून तू मला सोडतेय,’ असा अंदाज बांधत मंगेशने शेवटी रुपालीचा जीव घेतला. मारहाण कधीच साधी, छोटी, सहज नसते. तो एक गुन्हा आहे.
    आतापर्यंत चर्चा केलेले सगळे मुद्दे लग्नापूर्वीच बोलले जाणं, एकमेकांच्या इच्छा अपेक्षा लक्षात घेऊनच होकार/नकार कळवणं खूप महत्वाचं आहे. लग्न जरी दोघांचंच होत असलं, तरी इतर नाती ही लग्नामुळेच दोघांच्या आयुष्यात निर्माण होतात. त्या सगळ्या नात्यांनादेखील ट्रेनिंगची गरज असते. लग्नापूर्वीचं समुपदेशन जसं दोघांसाठी महत्वाचं आहे; अगदी तसंच समुपदेशन इतर नात्यांनादेखील गरजेचं आहे. खरं तर नात्यांसाठीदेखील प्रशिक्षण असावं, ज्यातून अधिक निकोप नाती निर्माण होण्याची शक्यता वाढेल.
    सगळ्या बाबींचा विचार जोडीदार निवडीच्या वेळीच करणं जास्त समर्पक आहे. लग्न झाल्यानंतर या एक एक बाबी समोर आल्या, की आपण अपेक्षा केलेला जोडीदार आपल्याला मिळाला नाही, याचं दुःख तर होतंच; शिवाय समोरच्याने बदलायच्या अपेक्षा वाढू शकतात. मुलांना आजकाल मॉडर्न, शिकलेली, कमावती बायको हवी असते. मात्र सोबतच बायको म्हणून ती टिपिकल असावी, अशी सुप्त इच्छादेखील असते. थोडक्यात काय, तर शिकलेल्या मुलांना शिकलेल्या मुलींना संभाळून घेणं जमेना आणि त्यांना तशी शिकवण देण्यात विषमता मूलक समाजाला उमजेना, अशी अवस्था आहे. म्हणूनच जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत आपण आपल्यासारखीच व्यक्ती निवडतोय, इतकंच नाही तर समोरच्या व्यक्तीला स्त्री किंवा पुरुष म्हणून असणारे हक्क किंवा कर्तव्यं कमी-जास्त नाहीत, तर आपल्या इतकेच आहेत, ही गोष्ट मनावर कोरून घेऊन जोडीदार निवडीला सज्ज व्हावं. विवेकी निवड यालाच म्हणता येईल.

~दिक्षा काळे

Responses

michael kors sale

I needed to post you one very little remark to finally thank you so much once again with the amazing tips you've discussed on this site. It has been certainly remarkably open-handed with people like you to allow publicly all a number of us could possibly have sold as an ebook to generate some cash for their own end, most importantly considering the fact that you might well have done it if you ever considered necessary. Those concepts as well acted as a fantastic way to realize that some people have a similar eagerness just as my personal own to grasp a great deal more in regard to this issue. I'm certain there are many more fun periods up front for individuals that read carefully your blog.

hermes belt

Thanks a lot for giving everyone an extremely nice opportunity to read from this web site. It can be so enjoyable and also packed with a good time for me personally and my office peers to search the blog a minimum of three times in one week to find out the newest items you will have. And lastly, we're usually satisfied with all the incredible methods you serve. Some 3 facts in this post are indeed the most beneficial we have had.

bape hoodie

I wanted to put you a tiny note so as to give many thanks again for these beautiful methods you've featured at this time. It is so strangely generous of people like you giving extensively what exactly a number of us could have sold as an ebook to generate some cash for their own end, most importantly given that you could possibly have tried it in the event you desired. Those good ideas likewise acted to provide a fantastic way to fully grasp that other individuals have a similar desire similar to my personal own to grasp good deal more concerning this condition. I'm sure there are numerous more pleasurable situations up front for individuals who start reading your site.

off white nike

Thanks so much for providing individuals with such a remarkable chance to check tips from this website. It is always very pleasant plus stuffed with fun for me and my office fellow workers to visit your website more than thrice per week to learn the latest things you have. And of course, we are actually satisfied considering the effective tips and hints you give. Some 3 areas in this article are really the very best I have had.

crazy explosive

I wish to point out my passion for your kindness supporting individuals that absolutely need assistance with your subject matter. Your special commitment to getting the solution throughout appeared to be definitely important and has helped women much like me to get to their endeavors. The insightful hints and tips means a great deal to me and much more to my colleagues. Many thanks; from everyone of us.

jordan 12

A lot of thanks for all your effort on this web page. Betty enjoys setting aside time for research and it's really easy to understand why. My spouse and i notice all about the lively means you convey very useful tactics on the web site and as well encourage participation from other people about this subject then our princess has always been discovering a whole lot. Take advantage of the remaining portion of the year. Your doing a pretty cool job.

jordan 11

I wanted to write you the tiny note just to thank you again for those remarkable basics you've shared in this article. It is quite open-handed with people like you giving easily just what a lot of people could have offered for sale for an ebook in order to make some profit on their own, specifically considering the fact that you might have tried it in case you decided. The things as well served to become easy way to know that many people have similar keenness just as my very own to see very much more in terms of this problem. I know there are millions of more pleasant instances ahead for individuals who read your blog.

foamposites

I simply wanted to thank you very much again. I'm not certain the things I might have made to happen in the absence of those strategies revealed by you on such subject. It had become a real challenging scenario in my position, but spending time with the very expert fashion you dealt with it took me to weep with joy. I will be happy for this help as well as believe you are aware of a great job you're putting in instructing many others thru your web site. I'm certain you've never got to know all of us.

adidas stan smith uk

I precisely needed to say thanks once again. I'm not certain the things that I could possibly have carried out without those techniques contributed by you relating to my question. It previously was a real traumatic setting in my circumstances, however , spending time with this expert mode you processed that forced me to jump for gladness. Now i'm grateful for your guidance and thus have high hopes you comprehend what a powerful job you have been putting in instructing the mediocre ones with the aid of your site. I'm certain you have never got to know any of us.

yeezy boost

I wish to convey my affection for your generosity supporting individuals who actually need help on your concept. Your very own dedication to passing the solution throughout became surprisingly powerful and has continually helped men and women like me to realize their pursuits. Your personal helpful tutorial signifies this much a person like me and additionally to my office workers. Thanks a ton; from all of us.

crazy explosive

I wanted to draft you that very small remark just to thank you over again for these splendid tricks you've documented in this article. It is simply generous of you in giving extensively precisely what a few individuals could have offered for an e book in making some profit on their own, notably given that you could possibly have done it in case you considered necessary. Those techniques also acted like a easy way to be certain that the rest have the identical interest the same as my personal own to find out good deal more in respect of this matter. I am sure there are numerous more pleasant sessions ahead for many who scan your blog.

off white hoodie

I wanted to compose a message so as to express gratitude to you for all the pleasant strategies you are placing at this website. My time intensive internet investigation has at the end of the day been rewarded with reputable content to write about with my co-workers. I 'd repeat that many of us readers are unquestionably fortunate to exist in a notable community with very many special professionals with beneficial hints. I feel truly lucky to have encountered your webpage and look forward to really more exciting times reading here. Thank you once more for everything.

goyard handbags

Thank you for all your valuable effort on this site. Gloria take interest in conducting investigations and it is easy to understand why. Many of us know all of the powerful ways you produce insightful guidelines via the website and in addition encourage response from others about this subject matter and our own girl is undoubtedly being taught a whole lot. Enjoy the rest of the year. You are always performing a glorious job.

Leave your comment